‘उद्धव व्हायरस’पेक्षा कोरोनाबाबत आरोग्यमंत्र्यांची पत्रकार परिषद चांगली : नितेश राणे

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात. ही पत्रकार परिषद संजय राऊत यांच्या ‘उद्धव व्हायरस’ राज्यात येणार यापेक्षा चांगली आहे, अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटवरून केली आहे.

 

राज्यात कोरोनाचा धोका वाढत असताना राजकीय वातावरणही पेटले आहे. कोरोनावरुन भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी केलेल्या पोस्टवरुन वादंग निर्माण झालेलं असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेनेला टोला हाणला आहे. कोरोनाबाबत जनजागृती आणि माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे नियमित पत्रकार परिषद घेत असतात. यामुळे लोकांना माहिती मिळत असते ही पत्रकार परिषद बघणे चांगले आहे असे नितेश राणेंनी म्हटले आहे.

Protected Content