Home क्राईम देशात बलात्कार थांबणार असतील तर आम्हाला खुशाल फासावर लटकवा

देशात बलात्कार थांबणार असतील तर आम्हाला खुशाल फासावर लटकवा


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आम्हाला फासावर लटकवल्याने देशात बलात्कार थांबत असतील तर खुशाल फाशी द्या. पण अशाने बलात्कार थांबणार नाहीत, असे निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय एका तुरुंग अधिकाऱ्याला बोलल्याची माहिती समोर आली आहे.

 

उद्या सकाळी म्हणजे २० मार्चला सकाळी ५.३० वाजता चारही दोषींना फासावर लटकवले जाणार आहे. तुरुंग प्रशासनाने जवळपास आणखी १० कर्मचाऱ्यांना फाशी देण्यात येणाऱ्या विभागात तैनात करण्यात आले आहे. पवन जल्लादने बुधवारी फाशीचा सराव केला गेला. दोषींना उद्या पहाटे तीन वाजता उठवण्यात येईल. त्यांना आंघोळ आणि नाश्त्यासाठी विचारले जाईल. फाशीच्या दोन चौथऱ्यांवर चार फास लावण्यात आले आहेत. तिथे चौघा दोषींना फाशी दिली जाईल. यापैकी एका चौथऱ्याचा चाप जल्लाद पवन ओढेल तर दुसऱ्या चौथऱ्याचा चाप तुरुंग प्रशासनाचे कर्मचारी ओढतील.


Protected Content

Play sound