राज्यस्तरीय मेळाव्यासाठी जैन पत्रकारांना आवाहन

चोपडा प्रतिनिधी । जैन समाज बांधवाच्या प्रबोधनासाठी व समाजातील कार्यरत असणाऱ्या पत्रकारांचा समाजातील विविध विषयावर चर्चा होणेसाठी संघटन काळाची गरज आहे. त्यासाठी राज्यस्तरीय जैन पत्रकारांची गणना व नियोजनबद्ध मेळाव्यासाठी नांव नोंदणीचे आवाहन खान्देश जैन पत्रकार व प्रसिध्दी प्रमुख सतीष वसंतीलाल जैन कुसुंबा यांनी केले आहे.

संगठन कौशल्य जैन समाजाच्या युवकांमध्ये असणे ही काळाची गरज आहे. नव तंत्रज्ञानाबरोबर प्राचीनतेची सांगड , सामाजिक एकात्मता , त्यागवृत्ती, जीवदया, कारुण्यभाव, धर्मभक्ती, देशभक्ती, संस्कृती, अभिमान आदीसह अनेक विषयानुसार समाजातील सर्व पंथातील पत्रकारांना, नवयुवकांना एकसुत्रतेत बांधण्यासाठी पत्रकार मेळावा घेण्याची गरज भासत आहे. याकरीता आपण कार्य करीत असलेले दैनिक, मासिक, पाक्षिक, साप्ताहिक यांचे नiव , पत्ता , भ्रमणध्वनी क्रमांक, अन्य माहिती सह ज्या दैनिकांत सदर बातमी छापून आली त्याचे नांव , सोबत प्रसिद्ध झालेली बातमीचे कात्रण जोडणे आवश्यक आहे. राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी मेळाव्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोज सतीश जैन यांनी केले आहे.

Protected Content