लाखोंचा अवैध गुटखा पकडला ; रावेर पोलिसांची धाडसी करावाई

 

रावेर (प्रतिनिधी) मध्य प्रदेशामधून महारष्ट्रात बंदी असलेला साधारण सव्वा लाखाचा गुटखा घेऊन येणाऱ्या दोघांना रावेर पोलिसांनी अटक केली आहे. ही धडाकेबाज कारवाई रावेर शहरातील व्हि.एस.नाईक कॉलेज नजिक करण्यात आली. यामुळे अवैध गुटखा वाहतुकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुरहानपुर (मध्य प्रदेश ) येथून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व सिगारीटचे पाकिटे अंदाजे सव्वा लाखाचा माल अनधिकृतपणे एम.एच 19 2955 या मारुती सुजुकी व्हरसा या गाडीत भरून यावलच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती रावेर पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे व साहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना मिळाली. त्यानुसार आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तत्काळ कर्मचाऱ्यांना सूचना देत सापळा रचून अवैध गुटखा घेऊन जाणा-या वाहनाला पकडले. याप्रकरणत पोलिसांनी सोयब खान व साजिद खान दोघे (रा. बाबूजी पूरा यावल) यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पो कॉ भागवत धांडे, पो कॉ महेंद्र पाटील,पो कॉ मंदार पाटील, पो कॉ पुरषोत्तम पाटील,पो कॉ हर्षल पाटील, पो.हे.कॉ. सतीष सानप यांचा सहभाग होता.

 

पंचनामा करून गुन्हा दाखल करणार

रावेर पोलिसांनी पकडलेल्या गुटखाचा उद्या सकाळी पंचनामा होणार आहे. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे अन्न व प्रशासन अधिकारी विवेक पाटील यांनी सांगितले.

Protected Content