रावेर, प्रतिनिधी । जनता दरबाराच्या तक्रारीची दखल घेत निंबोल येथील प्लॉटची तहसिलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे, सह गट विकास अधिकारी हबीब तडवी यांनी सयुंक्त पाहणी करून संबधित गावच्या ग्राम सेवाकाला यासंदर्भात तात्काळ लेखी खुलासा मागविण्यात आला आहे.
ग्राम पंचायत दप्तरी लावण्या संदर्भात आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या जनता दरबारात येथील प्लॉटधारकांनी तक्रार केली होती याची दखल घेत तहसिलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे,सह गट विकास अधिकारी हबीब तडवी,आज गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सरपंच आशा सोनवणे, ग्राम सेवक गणेश पाटील, तलाठी निलेश चौधरी, किरण शेलोळे, ग्राम पंचायत सदस्य किशोर तायडे, संदीप धनगर, जगनाथ पाटील, सुभाष कोळी, विनोद कोळी, पांडुरंग कोळी, शामराव भवरे, ईश्वर पाटील, श्रीराम कोळी आदी प्लॉटधारक व नागरीक उपस्थित होते
तहसिलदारांची तलाठी कार्यालयाला भेट
यावेळी निंबोल गावाच्या तलाठी कार्यालयाला तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे यांनी भेट देऊन शासनाच्या काम-काजाची माहिती घेतली यामध्ये वसूली,शासकीय योजना शेतक-यांन पर्यंत पोहचत आहे की नाही याचा देखिल आढावा सौ देवगुणे यांनी घेतला.