Home क्राईम येस बँक मनी लाँड्रिंग प्रकरण : अनिल अंबानी यांना इडीची नोटीस

येस बँक मनी लाँड्रिंग प्रकरण : अनिल अंबानी यांना इडीची नोटीस


मुंबई (वृत्तसंस्था) ‘येस बँके’चे संस्थापक राणा कपूर आणि इतरांविरुद्ध सुरु असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘रिलायन्स समूहा’चे अध्यक्ष अनिल अंबानी यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

 

‘येस बँके’ने दिलेल्या कर्जाच्या संदर्भात अनिल अंबानी यांची चौकशी होणार आहे. अंबानींना मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांसमोर आज हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत अनिल अंबानींचा जबाब नोंदवण्यात येणार होते. परंतू अनिल अंबानी यांनी वैद्यकीय कारण देत हजेरीसाठी अधिकचा वेळ मागितला आहे.


Protected Content

Play sound