


मुंबई वृत्तसंस्था । करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरला लागू करण्यात आलेले निर्बंध आता संपूर्ण राज्याला लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत नाट्यगृहे, सिनेमागृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि जीम बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक पाठवून तसे आदेशच दिले आहेत.
पनवेल मनपातर्फे परदेशातून आलेल्या नागरिकांसाठी सेंटर
पनवेल महानगरपालिकेतर्फे परदेशातून आलेल्या लोकांसाठी एक सेंटर तयार करण्यात आले आहे. खारघर येथील ग्रामविकास भवन येथे सेंटर तयार करण्यात आले आहे. दुबई येथून रात्री आलेल्या 9 लोकांना या सेंटर मध्ये ठेवण्यात आलेले आहे. आज आणि उद्या येणाऱ्या परदेशातील लोकांना याच सेंटरमध्ये 14 दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.


