Home Cities जळगाव आरपीआय जळगाव युवक महानगर अध्यक्षपदी मिलिंद सोनावणे

आरपीआय जळगाव युवक महानगर अध्यक्षपदी मिलिंद सोनावणे

0
27


जळगाव , प्रतिनिधी । जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया आठवले गटाची जिल्हा बैठकीत जळगाव युवक महानगर अध्यक्षपदी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ व्या जळगाव महानगर सर्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मिलिंद सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.

मिलिंद सोनावणे यांच्या निवडीबद्दल त्यांना रीपांई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष राजूभाई सुर्यवंशी, लक्ष्मण जाधव, युवक अध्यक्ष भगवान सोनवणे, युवक अध्यक्ष रवीभाऊ सपकाळे, महानगर अध्यक्ष अनिलभाऊ आडकमोल, गिरीश तायडे, रमाताई ढिवरे, विनोद मोरे, मिलिंद तायडे, जयसिंग रायसिंगे, विष्णु पारधे, पप्पू सुरळकर, प्रविण बाविस्कर, विक्कि तायडे, संजय तायडे, प्रतात बनसोडे, प्रतिक सपकाळे, अक्षय मेघे, मुकेश सपकाळे, खरात भाऊ सर्व तालुका शहर अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिली


Protected Content

Play sound