Home क्राईम तीन युवकांकडून विद्यार्थिनीचा पाठलाग; तक्रार दाखल

तीन युवकांकडून विद्यार्थिनीचा पाठलाग; तक्रार दाखल

0
35
FIR

जळगाव प्रतिनिधी । महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थिनीचा तीन युवकांकडून पाठलाग करून रस्त्यात अडवून तिच्यासोबतच्या विद्यार्थ्यालाही धमकी दिल्याची तक्रार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल झाली.

तक्रारदार विद्यार्थिनी शिवाजी नगरातून एम. जे. कॉलेजमध्ये शिकण्यासाठी दुचाकीवर येते. १० मार्च रोजी कॉलेज सुटल्यानंतर ती मित्रांसोबत घरी जात होती. त्यावेळी जिल्हा बँकेजवळ दुचाकीवर आलेल्या युवकांनी तिला अडवले. यावेळी ती युवती व तिच्या मित्रांना धमकावण्यात आले. यातील एका युवकाचे नाव रईस खान उर्फ छोटू असे असून त्याच्या सोबत असणार्‍या दोघांची नावे रईस खान जाफर खान रा. मिर्झा चौक शिवाजीनगर, आमीर अनिस शेख रा.पाकीजा बिल्डिंग शिवाजीनगर अशी आहेत. या संदर्भात संबंधीत विद्यार्थीनी व तिच्या पालकांनी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या मदतीने या युवकांविरूध्द जिल्हा पेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली असून या युवकांपासून जिवाला धोका असल्याचे विद्यार्थिनीने तक्रारीत म्हटले आहे.


Protected Content

Play sound