Home Cities जळगाव फाग महोत्सवात आदर्श माहेश्वरी महिला मंडळ प्रथम

फाग महोत्सवात आदर्श माहेश्वरी महिला मंडळ प्रथम

0
53


 

जळगाव,प्रतिनिधी । येथील आदर्श माहेश्वरी महिला मंडळाने तालुका माहेश्वरी मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फाग महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी नृत्य सादरीकरणात आदर्श माहेश्वरी महिला मंडळाला प्रथम पुरस्कार मिळाला.

तालुका संघटनेतर्फे १३ मार्च रोजी फाग महोत्सव उत्साहात घेण्यात आला. यात विविध संघटनातर्फे होळीविषयक गीते सादर झाली. यात आदर्श माहेश्वरी महिला मंडळाने महाराष्ट्रीयन थीम घेत “आला होळीचा सण लयी भारी, चल नाचूया” या गीतावर बहारदार नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकून घेतली.  या गीताला प्रथम बक्षीस मिळाले. मंडळाच्या संघात कीर्ति काबरा, मोनिका कासट, सुवर्णा मुंदड़ा, मनिषा मणियार, प्रिया दहाड़, स्वाति जाखेटे, अर्पिता लाठी, नेहा लाठी, मधु तापड़िया यांचा सहभाग होता. यावेळी अध्यक्षा मनीषा तोतला आणि सचिव अमिता सोमाणी यांनी पारितोषिक प्राप्त सदस्यांचे अभिनंदन केले.


Protected Content

Play sound