नगरसेविका योजना पाटील यांना राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार प्रदान

भडगाव प्रतिनिधी । यशस्विनी सामाजिक अभियान प्रमुख़ नगरसेविका योजना पाटील यांना धुळे येथे राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

धुळे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या वतीने सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल योजनातापई पाटील यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अध्यक्षस्थानी नाशिक एम.व्ही.पी.संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे होते.आमदार मंजुळाताई गावित यांचे हस्ते गोपीचंद पाटील,संजय भामरे,आर.डी.पाटील,विलास झालटे,डी.आर.पाटील,डी.बी.पाटील,प्रेमकुमार अहिरे आदि मान्यवर पदाधिकारी,समिती सदस्य यांच्या प्रमुख़ उपस्थितित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

योजना पाटील यांचा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,डॉ,सतीश पाटील,आमदार,माजी आमदार दिलीप वाघ,आमदार किशोर पाटील, कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,पीटीसी संस्थेचे चेअरमन संजय वाघ,बाजार समिती सभापती सतीश शिंदे,तहसीलदार माधुरी आंधळे,पी.आय.धनंजय येरुळे,मुख्याधिकारी विकास नवाले,आरोग्य अधिकारी डॉ.पंकज जाधव आदि मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content