Home राजकीय ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाहीत ; मनसेच्या शॅडो कॅबिनेटला राज ठाकरेंची सक्त...

ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाहीत ; मनसेच्या शॅडो कॅबिनेटला राज ठाकरेंची सक्त ताकीद


 

मुंबई (वृत्तसंस्था) सरकारवर अंकुश असावा म्हणून हे शॅडो कॅबिनेट आहे. मला सांगितल्याशिवाय पुढे जायचे नाही. पत्रकार परिषद मला सांगितल्याशिवाय घ्यायची नाही. ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाही, अशा सक्त सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटमधील पदाधिकाऱ्यांना दिला.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 14 व्या वर्धापन दिनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी राज म्हणाले, यावेळी मनसेच्या बहुचर्चित प्रतिरुप मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगले काम करेल तिथे त्यांचे अभिनंदन पण करू. तसेच चढ उताराच्या काळात तुम्ही माझ्याबरोबर राहिलात त्याबाबत धन्यवाद,असेही ठाकरे म्हणाले. तसेच जे विषय आहेत ते 25 मार्चला शिवतीर्थावर मांडेन, असेही त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound