बुलढाणा प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलडाण्याच्या दिव्या फाउंडेशन च्या वतीने उडाण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात यशस्वी वाटचाल करणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.
यात कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या पतीच्या जीवनाच्या संघर्षासाठी मॅरेथॉन धावणारी ६५ वर्षीय लता करे जिजामाता पुरस्काराने सन्मानित करण्यात तर सुवर्ण पदक विजेती तिरंदाज मोनाली जाधव, चला हवा येऊ द्या फेम चैताली मानकर, प्रचिती पुंडे व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नर्मदाबाई जाधव यांना ताराबाई शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोबत इतर सुकन्यांचा दिव्या फाउंडेशन कडून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.