यावल प्रतिनिधी । यावल येथे पोलीस प्रशासनातर्फे जागतिक महीला दिनानिमित शहर व परिसरात विविध क्षेत्रात आपल्या कतृत्वावाचा व कार्याचा ठसा उमटविऱ्या समाजसेविका महीलांचा सन्मान करण्यात येवुन याप्रसंगी त्यांच्याहस्ते भरोसा सेलचे उद्घाटन करण्यात आलेत.
यावल येथे पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या आदेशाने पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांच्याहस्ते आज ८ मार्च रोजी जगातिक महीला दिनानिमित यावल शहरात व परिसरात आपल्या कतृत्वाने शैक्षणीक सामाजिक व आदी कार्याने समाजाला परिवर्तनाची नवी दिशा देणाऱ्या कतृत्वान महीलांचा यावेळी गुलाबपुष्प देवुन स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी आज समाजात महीलांच्या वतीने विविध क्षेत्रातील कार्य हे आपण सर्वासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगुन महीलांच्या उल्लेखानिय कार्याचा गौरव केला. यावेळी पोउनि सुनिता कोळपकर, सेवानिवृत मुख्याध्यापिका माधुरी जावळे, व्दारका पाटील, अॅड. मृणालीनी सराफ यांनी आपले मनोगत व्यक्त केलीत. याप्रसंगी महिला दक्षता समिती सदस्य व महीला गृहरक्षक दलाच्या सेवाकार्य करणाऱ्या महीला यांच्यासह महीला दक्षता समितीच्या अॅड. मृणालीनी सराफ, सामाजिक कार्यकर्ता व्दारका पाटील, वैद्यकिय परिचारीका महीला पोलीस कर्मचारी ही याप्रसंगी आवर्जुन उपस्थित होत्या. यावल पोलीस प्रशासनाच्या माध्यमातुन पोलीस काका व पोलीस दिदी कॉप्स तयार करण्यात आल्याची माहीती पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी दिली .