Home क्राईम चॉकलेटचे आमिष दाखवत तीन अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण

चॉकलेटचे आमिष दाखवत तीन अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण


अकोला (वृत्तसंस्था) चॉकलेटचे आमिष दाखवत एका बँक कर्मचाऱ्यांने ३ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार अकोला जिल्ह्यात उघडकीस आला आहे. जयप्रकाश गावंडे असे या आरोपीचे नाव आहे.

 

अकोला जिल्ह्यात लहान मुलांचे चॉकलेटचे आमिष दाखवून एका अर्बन बँकेत काम करणारा लिपिक जयप्रकाश गावंडे कडून केला जात होता. तेरा ते चौदा वयोगटातील मुलांना चॉकलेटचे आमिष दाखवत हा नराधम लैंगिक शोषण करायचा. एका मुलाच्या नातेवाईकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी गावंडेविरोधात सिव्हिल लाइन पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गावंडेविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याच्यावर पॉस्कोसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


Protected Content

Play sound