Home Cities जळगाव जळगावात ‘आई’ विषयावर राज्यस्तरीय कविता स्पर्धा

जळगावात ‘आई’ विषयावर राज्यस्तरीय कविता स्पर्धा


जळगाव (प्रतिनिधी) येथील दर्पण जगत फौंडेशनतर्फे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी “आई” हा विषय देण्यात आलेला आहे.

स्पर्धकांनी आपल्या कविता मराठी भाषेतच पाठवायच्या असून सोबत १०० रुपये प्रवेश शुल्क ‘दर्पण जगत’ नावाने धनादेशाद्वारे पाठवायचे आहे. त्यासाठी इच्छुकांनी पवन खंबायत प्लॉट नं. ४/सी, स्वानंद नगर, जुना खेडी रोड, जळगाव येथे संपर्क साधायचा आहे. स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस १५०० रु, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय बक्षिस ७०० रु. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय बक्षिस ५०० रु, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ पाच बक्षिसे देण्यात येणार असून त्यात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound