जळगाव प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून एका वयोवृध्द महिलेला शिवीगाळ करून तिक्ष्ण हत्याराने हातावर वार करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील रामदेववाडी येथे रात्री घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुसयाबाई उत्त जाधव (वय ६५) रा.रामदेववाडी जळगाव हे आपला मुलगा जन्मजय उत्तम जाधव सोबत राहेते. ३ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घराच्या ओट्यासमोर बसलेल्या असतांना समोर कुत्रा आणि मांजर यांचे भांडण सुरू होते. दोघांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करीत असतांना शेजारी राहणारे किसन हरी जाधव व त्याची पत्नी वंदना हरी जाधव यांनी घरातून तिक्ष्ण हत्याराने अनुसयाबाई यांच्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. व मारहाण करण्यास सुरूवात केली. हे पाहुन अनुसयाबाई यांचा मुलगा जन्मजय हा बाहेर गेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात किसन हरी जाधव आणि वंदना किसन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बळीराम सपकाळे करीत आहे.