नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरातील तज्ञांनी करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी एखाद्या ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे यावर्षी मी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे.
दिल्लीतील आयटीबीपी कॅम्पमध्ये कोरोनाचे १५ रुग्ण आढळून आल्यानंतर सरकारी यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा धोका टाळण्यासाठी यंदा होली मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे मोदींनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर तज्ञांनी नरेंद्र मोदींना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्याचे टाळण्याचा सल्ला दिल्यानंतर मोदी यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळेच नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपण होळीच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे.