Home Cities अमळनेर अमळनेर येथे विश्वकर्मा जयंती साजरी

अमळनेर येथे विश्वकर्मा जयंती साजरी


अमळनेर (प्रतिनिधी) विश्वकर्मा जयंतीनिमित्त अमळनेर गाडी लोहार समाज मंडळ अमळनेर यांच्यावतीने लोहार समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्हैयालाल सांगोरे हे होते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा.डी.एस. लोहार, उपाध्यक्ष चंद्रकांत नंदलाल लोहार तसेच समाज मंडळाचे ज्येष्ठ सदस्य गजानन छगन लोहार हे उपस्थित होते.

पुलवामा या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना व समाजातील दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रतिमापूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते न करता जे समाज बांधव कारागीर म्हणून काम करतात, त्यांच्या हस्ते करण्यात आले. मनोगतामध्ये राठोड यांनी कार्यक्रमासंदर्भात कौतुक केले. त्याचबरोबर प्रा.लोहार यांनी आपल्या मनोगतात समाजबांधवांनी वार्षिक मीटिंगच्या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हेमकांत लोहार यांनी केले तर आभार सौ. नेहा लोहार यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound