Home Cities धरणगाव महात्मा फुले हायस्कूलमध्ये अमर जवानांना भावपूर्ण आदरांजली

महात्मा फुले हायस्कूलमध्ये अमर जवानांना भावपूर्ण आदरांजली


धरणगाव (प्रतिनिधी) पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्यांतील अमर जवानांना येथील महात्मा फुले हायस्कूल, धरणगावच्यावतीने नुकतीच भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

जम्मूच्या पुलवामामध्ये अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड व भेकड हल्ला केला.यामध्ये भारतीय सैन्यातील 42 जवान शहीद झाले व अनेक जवान गंभीर रित्या जखमी झाले. या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. उरीतील दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही देशवासियांच्या मनात कायम आहेत.त्यातच १४ फेब्रुवारी चा हल्ला सर्वात मोठा अतिरेकी हल्ला मानला जात आहे. दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिल्याशिवाय शांत बसता येणार नाही अशी भावना सर्व देशवासी व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर धरणगाव शहरातील महात्मा फुले हायस्कूल , धरणगाव व शहरातील नागरिकांच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.तसेच सर्व शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी वृंद व शाळेतील सर्व विदयार्थी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound