अमळनेर प्रतिनिधी । अॅक्टिव्ह स्पोर्ट्स क्लबच्या नावाने झन्ना मन्ना जुगार खेळताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी २० जणांना अटक करून त्यांच्याकडून ९५ हजार ७५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.
जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बापू रोहम, एपीआय स्वप्नील नाईक, अनिल देशमुख, विनोद पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, विलास पाटील, रामकृष्ण पाटील, मुरलीधर बारी यांनी छापा टाकून जुने स्टँड परिसरात असणार्या अॅक्टिव्ह स्पोर्ट्स क्लबमध्ये काही लोक पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले. त्यात बबलू शेख सुपडू (वय २८ रा. जोशींपुरा), नाना भास्कर पाटील (रा. झामी चौक), सुधाकर चिंधु माळी (रा. वरवाडे ता.शिरपूर) , सागर प्रकाश इंगळे (वय २५, रा. मिळचाळ), कैलास सुकलाल धनगर(वय ४५ वरवाडे ता. शिरपूर) ,प्रल्हाद दामोदर भावसार (किसमत नगर, शिरपूर) , शांताराम धापु कोळी (रा. वाघाडी शिरपूर) , युनूस संमद पटेल रा. वाडी शिरपूर , संजय रूपंचंद चौधरी (रा. तांबेपुरा ,अमळनेर) ,नंदू गणेश चव्हाण रा. मिळचाल, भीमराव हिरामण पाटील (रा.पैलाड),विलास शामराव महाजन (रा.बालाजीपुरा),रहीम शाह सत्तार शाह (रा.वाडी ता. शिरपूर),शांताराम नानु साळुंखे (सुंदरगडी चोपडा) , अनिल दिगंबर पाटील(अमळनेर), नारायण दिगंबर मराठे (धुळे), प्रकाश सुदाम पाटील (शिरपूर), किरण रामसिंग बहारे (तांबेपुरा), नवल बोरसे (पैलाड) यांना अटक करण्यात आली आहे.