जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने आज सरदार वल्लभाई पटेल हॉलमध्ये भव्य शिक्षक मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी विधान परिषदेचे सभापती, ना.रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. तर विशेष अतिथी म्हणून शिक्षक आमदार व राष्ट्रवादी शिक्षक महाप्रदेश कमिटीचे प्रदेश अध्यक्ष विक्रम काळे उपस्थित होते. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर, रंगनाथ काळे, दिलीप वाघ, रविंद्रभैय्या पाटील, अनिल पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी सुनील चव्हाण ( पिंपळगाव खु. ता.पाचोरा), अविनाश पाटील ( गिरड. ता. भडगाव), गुलाब पवार ( देवळी ता. चाळीसगाव), चिंधु वानखेडे ( भिलाली, ता. पारोळा), विजय बिऱ्हाडे (मठगव्हाण ता. अमळनेर), बाळू मोरे ( फुलेनगर पाळधी ता. धरणगाव), स्वप्नील पाटील (कढोली, ता.एरंडोल), चंद्रकांत महाजन (बोरनार, ता. जळगाव), चंद्रकांत सुरवाडे (सोनारी ता. जामनेर), माधुरी भंगाळे ( कंडारी, ता. जळगाव), गिरीश सपकाळे (चुंचाळे ता. यावल), योगेश जवंजाळ ( बोरवड, ता. मुक्ताईनगर), शेख नासीर शेख अजीज (दोंदखेडा, ता. बोदवड), जितेंद्र पाटील ( मोरगाव, ता. रावेर), ईश्वर बाविस्कर (सनपुले, ता. चोपडा )
आर. आर. पाटील गुणवंत पुरस्कार : सीमा सैंदाणेे (भडगाव), प्रा. सुरेश पाटील (एरंडोल), पृथ्वीराज पाटील (बाळद, ता. पाचोरा), रवींद्र खोडपे (पाळधी, ता. धरणगाव), प्रवीण माळी (अजंटीसीम, ता. चोपडा) या ४५ शिक्षकांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.