नाशिक (वृत्तसंस्था) पत्नीची हत्या करुन लष्करी जवानाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली आहे.
लष्करात जवान असलेला सुनील बावा मूळ नाशिकचा रहिवासी आहे. सुनील दहा दिवसांच्या सुट्टीवर घरी आला होता. यावेळी सुनील आणि त्याची पत्नी चैताली बावा यांच्यामध्ये कुठल्या तरी कारणांवरुन वाद सुरु होता. या वादातूनच सुनीलने पत्नी चैतालीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर आरोपी सुनीलनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुनीलचा जीव वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बावा दाम्पत्यामध्ये घरगुती वाद असल्याचे बोलले जात असले, तरी हत्या आणि आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.