यावल (प्रतिनिधी) येथील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी शाखा व सर्व संलग्न संघटनांतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे १६ फेब्रूवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता पुलवामा येथे झालेल्या दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF च्या जवानांना श्रद्धांजली वाहुन पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. त्यानंतर स्व. बाळासाहेब ठाकरे भुसावळ टी पॉइंटवर पाकिस्तानचा पुतळयाचे दहन करण्यात आले या ठिकाणी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात येवून जोरदार निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी उपस्थितांनी भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देऊन पाकिस्तान जाहीर निषेध केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, उपजिल्हा संघटक दीपक बेहडे, शिवसेना तालुका प्रमुख रवी सोनवणे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रमुख गोटू सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद कोळी, शिवसेना नगराध्यक्ष सौ. सुरेखा कोळी, तालुका उपसंघटक जितेंद्र सरोदे, आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी, अल्पसंख्यांक तालुका संघटक हजार खाटीक, शहर संघटक सुनील बारी, सागर देवांग, पप्पू जोशी, संतोष धोबी, संतोष वाघ, मोहसीन खान, उमेश कुरकुरे, सागर बोरसे, शकील पटेल, तुराब पटेल, हमीद पटेल, शोयब पटेल, कुतुबुद्दीन शेख, जुनेद शेख, किरण कुंभार, अजय कुंभार, सचिन कुंभार, आकाश कुंभार, गोपाल कुंभार, अजय कुंभार, राहुल कुंभार, रवींद्र कोळी, पिंटू कुंभार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.