मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर भाजपचे धरणे आंदोलन

WhatsApp Image 2020 02 25 at 7.02.28 PM

मुक्ताईनगर प्रतिनिधी । राज्य सरकारने जनतेचा विश्‍वासघात केल्या असल्याचा आरोप करून आज भारतीय जनता पक्षातर्फे येथील तहसील कार्यालयासमोर माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले.

भाजपाचा विश्‍वासघात करुन काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱयांचा विश्‍वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असतांना शिवसेनेचे पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्‍या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्‍वासन पाळलेले नाही. महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी योजना आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ केली आहेत.केवळ पीक कर्जाचा या कर्जमाफीत समावेश केल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही.दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही. या सरकारला भाजपा सरकारच्या विकासकामांना स्थगिती देण्याशिवाय काही करता आले नाही.

भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पिक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेती उपकरण, पशुपालन, शेळीपालन, मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. भाजपा सरकारच्या व्यापक कर्जमाफीमळे ४३ लाख खातेधारकांना १९ हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता.तर खरेदीचे निकष जाणीवपूर्वक बदलण्यात आल्यामळे जेथे सन २०१७-१८ मध्ये प्रती हेक्टरी १४.५ क्विंटल खरेदी होत होती. तेथे आता सन २०१९-२० मध्ये प्रती हेक्टरी केवळ ८.४६ क्विंटल इतकीच खरेदी होत आहे. काही जिल्हांमध्ये तर हे प्रमाण ३.६ क्विंटल इतके कमी करण्यात आले आहे. तसेच गेल्या महिनाभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री गावोगावा सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जळणाऱ्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. असिड हल्ला, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला, तरुणी, मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Protected Content