Home क्राईम जळगावात एसटी बस चालकाला मारहाण

जळगावात एसटी बस चालकाला मारहाण

0
26

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगरात बस चालकाने कट मारल्याने पाण्याचे जार वाहून नेणारी रिक्षा कलंडल्यामुळे चालकास मारहाण करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरातून जळगावहून पळसोद येथे जाणारी एमएच४० वाय ५१९३ क्रमांकाची एसटी बस जात असतांना समोरून पाण्याचे जार वाहून नेणारी रिक्षा येत होती. यात बस चालकाने कट मारल्यामुळे रिक्षा (क्रमांक-एमएच१९-बीएम ०७४४) उलटी होऊन यातील पाण्याचे जार बाहेर फेकले गेले. यामुळे संतापलेल्या रिक्षा चालकाने बस चालकास मारहाण केली. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबली होती. रिक्षावाल्याने आपल्याला एसटी चालकाने कट मारल्याचा आरोप केला आहे. तर बस चालकाच्या मते कोणत्याही प्रकारचा कट वा धक्का लागलेला नाही. यामुळे या दोघांनी एकमेकांच्या विरूध्द तालुका पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलीसात याबाबत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound