भारतीयांचे आदरातिथ्य लक्षात राहिल : डोनाल्ड ट्रम्प

tramp

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतातील 2 दिवस विलक्षण होते, विशेषत: काल मोटेरा स्टेडियममध्ये. माझ्यासाठी हा एक मोठा सन्मान आहे. भारतीयांचे आदरातिथ्य लक्षात राहिल, अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मंगळवारी हैदराबाद हाऊसमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदनही दिले. यावेळी ट्रम्प म्हणाले येथील लोकं मोदींवर खूप प्रेम करतात. मी जेव्हा जेव्हा मोदींचे नाव घ्यायचो तेव्हा ते आनंदाने ओरडत होते. मोदी येथे उत्तम काम करत आहेत. आम्हाला गांधीजींच्या आश्रमात आम्हाला खास अनुभूती झाली. मोदींशी बोलताना 3 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण करारावर सहमती झाली आहे. दहशतवाद संपवण्यासाठी दोन्ही देश काम करतील. संतुलित व्यापारासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. तर आज राष्ट्रपती कोविंद आम्हाला मेजवानी देत ​​असल्याचेही ट्रम्प म्हणाले.

Protected Content