विवाहितेच्या छळप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा

Crime Lady

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळवद येथे माहेर असलेल्या विवाहित तरूणी ही अपशकुनी असल्याचा अंधविश्वास ठेवून सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्र राज्यात कशा प्रकारे अंधश्रद्धा फोफावते आहे हे त्याचे जागते उदारण देणारे चित्र आहे. दिपाली अमोल खाडे (वय-२८) रा. आळंदा (रूस्तमाबाद) ता.बार्शी जि. अकोला या विवाहितेचे कोळवद ता यावल येथील माहेर अहे. यावल पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे लग्न आळंदा (रूस्तमाबाद) येथील राहणारे अमोल रमेशराव खाडे यांच्याशी १४ जून २०१८ रोजी लग्न झालेले होते. लग्न लागल्याच्या दोन ते तिन तासातच माझे सासरे रमेशराव विश्वनाथ खाडे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ते मरण पावले होते. म्हणुन माझी सासु निर्मला रमेशराव खाडे, पती अमोल रमेशराव खाडे, नंदोई पंकज गुणवंत घाटाळे, आते सासरे दिनकर प्रकाश नागे, नणंद प्रिया पकंज घाटाळे आणी माझी आते सासु इंदुबाई दिनकर नागे, नणंद प्रिया व इतर पाव्हणे मंडळीने माझे सासरे रमेश राव खाडे हे माझ्याशी लग्न लागल्यानंतर मरण पावल्याने ते मरण पावले. मी अपशकुनी आहे, असे बोलुन लग्न झाल्यापासुन माझा शिवीगाळ करून मानासिक व शारीरिक छळ करून मारहाण करीत मला जिवे ठार मारण्याची धमकी देत असे. सासरेची मंडळी माझ्या पती अमोल यांना तुझी पत्नी ही अपशकुनी आहे, तु हिला सोड आम्ही तुझे लग्न दुसऱ्या चांगल्या मुलीशी करू असे बोलायचे, नंतर माझे पती हे सिआरपीएफ मध्ये ड्युटीवर निघुन गेल्यावर मी माझे आई बरोबर आपल्या माहेरी कोळवद ता. यावल राहात आहे. अशी फिर्याद दियाली अमोल खाडे हीने यावल पोलीसात दिल्याने सासरच्या मंडळीच्या गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.‍नि. अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Protected Content