मुलगी पहायला आले अन लग्न करूनच गेले !

kasoda 4

कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी । येथील मागील आठवड्यात मुस्लिम समाजातील एका २७ वर्षीय तरुणाने प्रेमापोटी कॅन्सरग्रस्त आपल्याच मामाच्या मुलीशी लग्न केले होते. त्यातच येथिल माहेश्वरी समाजातील येथील प्रदिप हिरालाल झवर मुरमुरेवाले यांची मुलीगी पायल झवर हिस पाहण्यासाठी आलेला तरुणाने पाहण्याच्या कार्यक्रमात विवाहातील परंपरांना फाटा देत तिच्याशी थेट लग्न केल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

प्रत्येक तरुण तरुणींचे विवाहासंबंधी आकर्षण असते तर काहिंचे स्वप्न असतात. आवडीनिवडी असतात. ठरवुन दिलेला विवाह , प्रेमविवाह तर कुणी गुण जुळवून विवाह करतात. परंतु, कासोदा येथील फॅशन डिझानर मुलगी पायलला पहायला बेलापूर (श्रीरामपूर) येथील शरद रामनाथ बिहानी यांचा मुलगा रोहित हा आला. सकाळी मुलगी पसंत पडली व लागलीच दुपारी समाज बांधवांच्या साक्षीने कुठलाही पारंपरिक रितीरिवाज व मोठा खर्च न करता दोघं उच्चशिक्षित आहेत हेच गुण पाहून वरमाला टाकून रितसर लग्न लावल्याची अनुकरणीय व आदर्श घटना येथे दि.२० फेब्रुवारी रोजी घडलीे. अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर येथील उच्चशिक्षित एम.सी. ए. झालेला रोहित बिहाणी हा मुलगा मुलगी बघण्याच्याच्या निमित्ताने वडील व नातेवाईकांन सोबत पाहुणे म्हणून आलेत. त्यांना मुलगी पसंत पडली , म्हणून आत्ताच लग्न करावे का ? असा प्रस्ताव चर्चेदरम्यान ठेवण्यात आला. दोन्हीकडच्या प्रमुख ज्येष्ठ मंडळींनी विचाराअंती होकार दिला व बालाजी मंदिरात समाजबांधवांच्या साक्षीने हा विवाह रुढी परंपरांना फाटा देत , मुहूर्त तिथी वगैरे न पाहता लग्न पार पाडले. मुलगी पहायला आले पण लग्न करूनच गेले या विवाहाबाबत संपूर्ण पंचक्रोशीत या वधुवराचे कौतुक केले जात आहे. तर येथील माहेश्वरी सभा व माहेश्वरी महिला मंडळाने याकामी पुढाकार घेणाऱ्या सगळ्या मान्यवरांचा माहेश्वरी समाजातर्फे सत्कार केला. याकामी मुलाचे मामा मिलिंद मुंदडा, मुलीचे आजोबा गणपती झवर , झवर यांचे जावई सतीश राठी यांनी यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली . या निर्णयाचे कासोदा माहेश्वरी सभा व माहेश्वरी महिला मंडळाने कौतुक केले. या आदर्श विवाहाच्या निमित्ताने दोन्हींकडील परिवाराचा माहेश्वरी सभा जळगाव जिल्हा यांच्यावतीने एरंडोल तालुका विभाग सहसचिव आशिष बियाणी, समाजाचे अध्यक्ष शितल मंत्री , सेक्रेटरी कैलास सोमाणी, महाराष्ट्र प्रदेश सदस्य पत्रकार शैलेश मंत्री यासर्वांनी त्या नववधु वराचा सार्वजनिक सत्कार घडवून आणला. यावेळी माहेश्वरी समाज अध्यक्ष शीतल मंत्री , संजय नवाल , मधुकर समदाणी , जयप्रकाश समदाणी , अनिल मंत्री , डॉ.टावरी , कैलास अग्रवाल यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते . गावात या लग्नाची जोरदार चर्चा असून यापुढे असेच विवाह झाले पाहिजेत, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

Protected Content