नोकरीच्या बहाण्याने तरूणाला ९३ हजारात ऑनलाईन गंडा

cyber

जळगाव प्रतिनिधी । बनावट नोकरी कागदपत्र पाठवून तरूणांला ऑनलाईनच्या माध्यमातून ९३ हजारात गंडविणाऱ्या संशयित आरोपीला दिल्ली येथून सायबर क्राईमच्या पोलीसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी हा उच्चशिक्षीत असून दिल्लीत वकीलाची नोकरी करतो.

याबाबत माहिती अशी की, सचिन संजय मराठे रा. म्हसावद ता.जि.जळगाव हे बेरोजगार असल्याने नोकरी मिळावी या उद्देशाने नोकरी डॉट कॉम वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले. २२ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०१८ दरम्यान संशयित आरोपी रविसिंग, करन भातपूर, संग्राम भालेराव, करन लुत्रा, अनुभुती तनेजा, अनिलसिंग व श्रेया असे नाव सांगणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी अनेकवेळा फोन करून एचडीएफसी बँकेत नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र पाठवून सचिनकडून ऑनलाईनच्या माध्यमातून ९३ हजार रूपयांमध्ये गंडावले. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला भाग ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संशयितास दिल्लीतून केली अटक
पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी पोहेकॉ वसंत बेलदार, पोना दिलीप चिंचोल, पोकॉ गौरव पाटील यांनी संशयित आरोपी राहुल मदनलाल चौरसिया रा. उत्तम नगर, दिल्ली याला अटक केली. दरम्यान संशयित आरोपी राहुल हा बी.ए. एलएलबी शिकलेले असून दिल्ली येथे वकिलाची नोकरी करत आहे. वकीलीमध्ये पैसे कमी पडल असल्याने ऑनलाईन जॉब देणाऱ्या फेक कॉल सेंटरकडे वळला होता व त्यातून त्याला अधिक पैसे मिळू लागले. आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content