आग्रा (वृत्तसंस्था) प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजमहल पहिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे प्रचंड भारावले. ‘ताजमहल, भारतीय संस्कृतीचे समृद्ध आणि विविधतेने नटलेले एक उत्तम प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अहमदाबादेतली नमस्ते ट्रम्प कार्यक्रमानंतर ट्रम्प प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजमहल पाहण्यासाठी आग्र्यात आले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जॅरेड कुशनर सुद्धा आहेत. ट्रम्प यांनी पत्नी मेलानियासोबत ताजमहल कँपसमध्ये वॉक करत फोटो सेशन केला. टूरिस्ट गाइडने ट्रम्प आणि फर्स्ट लेडीला ताजमहलची माहिती दिली. त्यानंतर ताजमहल पाहून आश्चर्यचकीत झाले. व्हिजिटर्स बुकमध्ये त्यांनी ‘ताजमहल, भारतीय संस्कृतीचे समृद्ध आणि विविधतेने नटलेलं एक उत्तम प्रतीक’, असल्याचा अभिप्राय देखील लिहिला.