भुसावळ प्रतिनिधी । यावल नाका ते झेडटीएसपर्यंतचा रोड नगरपालिकाकडून रेल्वेचा हस्तांतरीत करण्याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यात आले.
यावर जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, यावल नाका ते झेडटीएसपर्यंतचा रोड संदर्भात मंत्रालयात फाइल पाठवली आहे त्वरित कारवाई करत आम्हाला भुसावल नगरपालिकेची प्रत व मन्त्रालयात पाठवलेली प्रतची १-१ प्रत आम्हाला दिली. आता लवकरात लवकर प्रधान सचिव,सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकड़े पालकमंत्री नामदार ग़ुलाबराव पाटिल यांचे सहकार्यने यावल नाका गांधी पुतळा ते झेडटीएस पर्यंतचा रोड हस्तांतरित करून रेल्वेच्या ताब्यात देण्यात यावा असे पत्र आणावे लागेल. जेणेकरून रेल्वे प्रशासनास रोड दुरुस्त करनेस अडचन येणार नाही.व जवळपास सातहजार कामगारांचा आरोग्याचा प्रश्न ही सूटेल, अपघात होनार नाहीत व सर्व कामगार वेळेवर नौकरीच्या स्यानावर पोहोचतील ललितकुमार मुथा, प्रदीप भुसारे, प्रीतम टाक, राजकुमार गवली यांनी निवेदन दिले. ललित भारम्बे, रूपसिंग पाटिल, सजंय चौधरी, विशाल सपकाले, समाधान हीवाळे, महेश राणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.