Home राजकीय ….म्हणून मोदी ट्रम्प यांची खुषमस्करी करताय : आंबेडकर

….म्हणून मोदी ट्रम्प यांची खुषमस्करी करताय : आंबेडकर


ad. aambedkar
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सीएए आणि एनआरसीमुळे देशात सुरु असलेला हिंसाचार आंतरराष्ट्रीय पातळीवर दडपला जावा, या हेतूनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा खुशामत करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला.

दिल्लीत ‘झी २४ तास’शी संवाद साधतांना आंबेडकर म्हणाले की, १ एप्रिलपासून देशात सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून अराजकता माजणार आहे. तर सध्या भारतात सुरु असलेला हिंसाचार दडपण्यासाठीच डोनाल्ड ट्रम्प यांची इतकी खुशामत केली जात आहे. भारत दौऱ्यावेळी ट्रम्प कोणताही करार करणार नाहीत. ते भारताला लुटण्याचे काम करणार आहेत.


Protected Content

Play sound