Home Cities यावल उत्कर्षा सातपुते एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

उत्कर्षा सातपुते एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

0
41

yash

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील रहीवासी सध्या फैजपुर तालुका यावल येथे राहात असलेले संजय मधुकर सातपुते यांची कन्या उत्कर्षा हि राजीव गांधी मेडीकल कॉलेज, कलवा ठाणे मुंबई येथील एमबीबीएसच्या अंतीम वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.

उत्कर्षा सातपुते हिचे पहीली ते दहावीपर्यंत शिक्षण कोरपावली तालुका यावल येथील डी. एच. जैन विद्यालयात झाले तर ११वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण उत्कर्षाने के. एन. नारखेडे विद्यालय भुसावळ येथे घेतले. उत्कर्षाला ज्ञानदीप शैक्षणीक स्पर्धा परिक्षा क्लासेसचे व वडील संजय मधुकर सातपुते मार्गदर्शन लाभले. ती शिक्षीका अलका बोरदे यांची कन्या आहे. उत्कर्षा हिने मिळवलेल्या या शैक्षणीक यशाबदल यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, फैजपुरचे नगरसेवक देवा साळी व सुनिल लाटे, वर्ड साळी फांउडेशनच्या मिनाक्षी नंदलाल साळी आणि कोरपावली़ येथील डी .एच .जैन विद्यालयाचे अध्यक्ष राकेश फेगडे सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक , सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी उत्कर्षा कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.


Protected Content

Play sound