चोपडा प्रतिनिधी । चोपडा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रकाश लोहार यांचे मांडू (मध्यप्रदेश) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या उपस्थितीत “रिकग्निशन अवार्ड” सन्मानपत्र व सुवर्णपदक देवून करण्यात आला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ, देवी अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, इंदोर आणि आदर्श इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यामानाने ३२व्या अखिल भारतीय प्राणीशास्त्र काँग्रेस व पृथ्वीवरील सजीवांची शाश्वती’ या विषयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
२०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्याहस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रकाश लोहार यांचा प्रदीर्घ शैक्षणिक व संशोधनाचा अभ्यास आहे. त्यांनी देश विदेशात संशोधकांच्या कार्याचे सादरीकरण हेतू तयार झालेल्या समितीचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
परिषदेत त्यांनी “जनुकीय विश्लेषण व त्याचे प्राण्यांच्या वर्गीकरणातील महत्व” या संशोधन कार्याची ओळख करून दिली. सेवा बजावित असताना त्यांच्या मार्गद्शनाखाली ३ एमफिल, ७ पीएच.डी. विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झालेली आहे. १५ पुस्तके भारताच्या ५६ विद्यापीठात संदर्भग्रंथ म्हंनुन समाविष्ट आहेत. त्यांनी ६२ शोधनिबंध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केले आहेत. १५ युरोपीय व ५ आशिया खंडाच्या शैक्षणिक संस्थांना त्यांनी भेटी दिलेल्या असून परदेशात ३ परिषदांचे यशस्वी आयोजन केले आहे.. त्यांचे जैवविविधेता, प्राण्यांचे वर्गीकरण, पर्यावरण रक्षण, ओषधी वनस्पतींचा योग्य वापर, डीएनए, बारकोड, इत्यादी महत्वपूर्ण विषयातील संशोधन वाखाणण्या जोगे आहे. सोव्हिएत रशियात १७८८ साली स्थापित लोमोनोसॉव मॊस्को स्टेट विद्यापीठाच्या जीवशास्त्र व पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटी ऑफ रशिया (रुडन) येथील जैवतंत्रज्ञान विभाग तसेच पुणे येथील बायोईरा या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेशी चोपडा महाविद्यालयाचा सांमज्यश करार करून संस्थेचा सन्मान वाढविला आहे. महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे येथे विज्ञान समितीचे सदस्य व लेखक म्हणून काम पाहिले आहे.
उल्लेखनीय व सात्यत पूर्ण कार्यामुळे मांडू येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जर्मनी चे डॉ उर्लीच बर्क, झेड.एस.आय.चे अध्यक्ष डॉ.बी.एन.पांडे, सचिव डॉ.कमल जयस्वाल व परिषदेचे आयोजक डॉ.शैलेंद्र शर्मा यांच्याहस्ते डॉ.पी.एस.लोहार यांचा अखिल भारतीय स्तरावरील प्राणीशास्त्राचा “रिकग्निशन अवार्ड” सन्मानपत्र व सुवर्णपदक देवून करण्यात आला. त्यांचा यशाबद्दल संस्थेचे संस्थपक डॉ.सुरेश पाटील, अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ.स्मिता पाटील व प्राचार्य डॉ.सुर्यवंशी यांनी प्रा.लोहार यांचे अभिनंदन केले.