कासोदा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन महिन्यात सात ठिकाणी चोऱ्या

कासोदा प्रतिनिधी । येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरात दोन ते तीन टपऱ्या २२ रोजीच्या पहाटे  पुन्हा फोडल्या. परंतू चोर सीसीटीव्हीत कैद  झाल्याचे समजते आणि चोरटे गावातील असून, ओळखीचेच असल्याचे बोलले जात आहे.

कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रवींद्र जाधव यांच्याकडे आता मोठे आव्हान उभे झाले आहे. कासोद्यात अनेक वृत्तपत्रांनी मागील महिन्यात चोरीच्या घटनांबाबत वेगवेगळ्या शीर्षकाखाली बातम्या प्रसारीत केल्या होत्या. परंतु अद्यापही त्याविषयी काही ठोस कार्यवाही झाल्याचे कळत नाही. गावात सतत होणाऱ्या चोरी , दरोड्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर संशय व्यक्त केला जात असून गावात भितीचे वातावरण पसरलेले आहे. लवकरच जर या चोरट्यांना पकडून जेरबंद केले नाही तर , गावात एखादी मोठी घटना घडली तर त्यास जबाबदार कोण ? अशी देखील चर्चा गावात सुरु आहे.आता कासोदा पोलीस स्टेशन याबाबत काय ठोस पाऊल उचलनार या कडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच जुगार, गुटखा, दारू हे देखील परिसरात जोरात सुरु असल्याचे दिसत आहे.या सर्वांवर देखील छोट्या खाणी कार्यवाही सोडल्या तर एकही ठोस कार्यवाही येथील स्थानीक पोलीस स्टेशन कडून झालेली दिसत नाही,  यावर देखील पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही  करून आडा घालावा अशी देखील मागणी गावातील सुज्ञ नागरीक करीत आहे. चोरटे, दरोडेखोर यांना  कडक शिक्षा व्हावी अशी मागणी  गावातील सुज्ञ नागरिक व छोटे मोठे व्यापारी वर्ग करीत असल्याची चर्चा चौका चौकात सुरू आहे.

Protected Content