भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ ट्रॉला उलटून एक जण ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, आज सकाळी अकराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सुभाष गॅरेज जवळ ट्रॉलास एका वाहनाने कट मारला. यामुळे वाहकाचे नियंत्रण सुटून हे वाहन थेट रस्त्यावरून खाली कोसळले. यात एक जण जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस स्थानकाचे कर्मचारी भागवत पाटील यांनी जखमीला रूग्णालयात पाठविण्यासाठी मदत केली. यातील मृत झालेल्याची ओळख अद्याप पटली नसून या संदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.