निकृष्ट प्रतीच्या रस्त्याच्या कामाची चौकशीची नागरिकांची मागणी

34

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील बामनोद ते सुना सावखेडा रस्त्याची झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे परिसरातील नागरिकांची तक्रार आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांनी तात्काळ या कामाची चौकशी करून संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील बामनोद सुना सावखेडा या गावात पुरातन काळातील प्रसिद्ध मारुतीचे भव्य मंदिर असल्याने गावाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या मार्गाने जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होत असल्याकारणाने शासकीय पातळीवर अडीच किलोमीटर रस्त्याचे काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत माजी आमदार व भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या कामाला लाखो रुपयांचा निधी मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि माजी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते या कामाचे उदघाटन करण्यात आले होते. अनेक प्रयत्नानंतर या मार्गासाठी राज्य शासनाकडून यश मिळाले होते. मात्र यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संबंधित ठेकेदाराने शासनाने ठरवून दिलेल्या निविदा व नियम धाब्यावर बसवून अत्यंत निकृष्ट प्रतीचे रस्ते तयार केले आहे. या रस्त्याची तात्काळ चौकशी होऊन सत्य काय ते पडताळणी करून निकृष्ट काम असल्यास त्या संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ मंडळीकडून करण्यात येत आहे.

Protected Content