अजिंठा चौफुली येथे ट्रॅक्टर ट्रॉली पलटली ; प्रवाशी रिक्षा दबली

accident5 201905244186

जळगाव, प्रतिनिधी । कुसुबांकडून ट्रॉलीत भरलेला कापूस घेऊन ट्रॅक्टर अजिंठा चौफुलीवर ईच्छादेवी चौकाकडे जाण्यासाठी वळण घेत होता. त्याचवेळी नेरीनाकाकडून ईच्छादेवीकडे प्रवाश्यांना घेऊन जाणार्‍या रिक्षावर कापसाने भरलेले ट्रॅक्टरची ट्राली पलटी होवून रिक्षा दाबली गेल्याची थरारक घटना रविवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर घडली. दैव बलवत्तर म्हणून रिक्षातील चालकासह तिघे प्रवासी घटनेत बचावले. दरम्यान घटनेनंतर रस्त्यावर कापसाचा ढीग झाल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. नागरिकांसह तरुणांनी मदतकार्य करत माणुसकीचे दर्शन घडविले. तर एमआयडीसी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न कापूस बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी झाली होती.

दानिश युनूस शेख हमीद, जहागीर शेख हनीफ तसेच सलमान शेख बिसमिल्ला रा. नंदुरबार हे शनिवारी जळगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वेतून उतरले. त्यानंतर शहरातील सालारनगरातील नातेवाईकांकडे जाण्यासाठी ते रिक्षा चालक गिरीष देशमुख यांच्या जवळील रिक्षा (क्रमांक एम.एच.19 व्ही. 1099) मध्ये बसले. प्रवाशांना घेऊन रिक्षा चालक वाहन घेऊन घाणेकर चौक, नेरीनाकामार्गे अजिंठा चौफुलीवर वळण घेत असताना कुसुंबाकडून कापूस घेऊन येत असलेला ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 सी.व्ही. 1970 ) वळण घेत असताना कापसाची ट्राली पलटी होऊन त्याखाली रिक्षा दाबली गेली. त्यामुळे रिक्षाचे टफ दाबले गेले. परंतु सुदैवाने प्रवाशीसह चालक या दुर्घटनेत बचावलेे गेले. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रिक्षातून बाहेर काढून तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविले. घटना कळताच सालारनगरातील नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली. याठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यानंतर जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये अधिकच्या उपचारार्थ दाखल करण्यात आले. महामार्गाच्या बाजूला ट्रॉली पलटी झाल्याने याठिकाणी कापसाचा ढीग लागला होता. हा कापूस जिनिंगमध्ये जात असल्याचे बोलले जात होते. दरम्यान दुसरे वाहन मागवून हा कापूस भरून त्याची रवानगी करण्यात आली. रिक्षाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रॅक्टर व रिक्षा दोन्ही अपघातग्रस्त वाहने एमआयडीसी पोलिसांनी ठाण्यात जमा केली आहेत. एका तरूणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

Protected Content