भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील जळगाव रोडवरील निलेश टायर हाऊसच्या मागील बाजूस अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून १४ हजार रोख रक्कम सकाळी लांबविल्याची घटना घडल्याने शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुशील वासुदेव झोपे (वय ४०, रा. जुना सातारा,मारुती मंदिरा जवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार दि. २२ रोजी ९. ३० वाजेच्या सुमारास निलेश टायर हाउस यांच्या मालकीच्या दुकानाच्या मागील बाजूने खिडकीचे गज वाकवून दुकानात प्रवेश करून ड्रावर मधून रोख रक्कम १४ हजार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत अज्ञात विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ इब्राहिम तडवी करीत आहे.