स्वागतासाठी एक कोटी लोकं येतील, फक्त ट्रम्प यांच्या बाजूला सनी लिओनीला उभे करा !

tramp and sunny

 

मुंबई (वृत्तसंस्था) ‘माझ्या स्वागतासाठी भारतात 1 कोटी लोक उपस्थित असतील,’ असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका व्हिडीओतून केला होता. त्यावर कतरीना कैफ, दीपिका पादुकोण आणि सनी लिओनी यांना ट्रम्प यांच्या बाजूला उभे करा १ कोटी लोकं येऊ शकतात, उपरोधिक ट्विट प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केले आहे.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी भारत दौ-यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तसारी सुरु असताना ‘माझ्या स्वागतासाठी भारतात 1 कोटी लोक उपस्थित असतील,’ असा दावा ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘ट्रम्प यांच्या स्वागताला 1 कोटी लोकही येऊ शकतात. फक्त यासाठी ट्रम्प यांच्या बाजूला अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरूख खान, कतरीना कैफ, दीपिका पादुकोण आणि सनी लिओनी यांना उभे करावे लागले,’ असे राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले.

Protected Content