खदानीत बुडून बालकाचा मृत्यू

death young 20180696727 1

पारोळा प्रतिनिधी । धरणगाव रस्त्यावरील खदानीत उमेश महाले या नऊ वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

उमेश महाले (वय ९) हा शनिवारी आपल्या एका मित्रासोबत धरणगाव रस्त्यावरील खदानीत गेला होता. मात्र, पोहता येत नसल्याने उमेश खोल पाण्यात बुडाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली. उमेशच्या पश्‍चात आजी-आजोबा, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.

Protected Content