Home Cities अमळनेर इंदिरा गांधी विद्या मंदिरात शहीद जवानांना श्रद्धांजली

इंदिरा गांधी विद्या मंदिरात शहीद जवानांना श्रद्धांजली

0
101

अमळनेर (प्रतिनिधी) येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत जम्मू- काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण वीरांजली वाहण्यात आली. सदर प्रसंगी माजी सैनिक पत्नी तसेच उपक्रमशील शिक्षिका भारती चव्हाण यांच्या हस्ते शहीद अमर जवान स्तंभ प्रतिमेला स्मृती सुमन आणि पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी मुख्याध्यापक संदीप पवार, नरेंद्र पाटील, पर्यवेक्षक डी.एन. पाटील, सी.एस. पवार, पी.एम. ठाकरे, ए.पी .जाधव , पी.ए. शेलकर, सागर महाजन, हेमंत साळुंखे, अशोक सैदाणे, शिवाजी पाटील, धर्मेंद्र पाटील आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात शोक व्यक्त करतांना डी.ए. सोनवणे यांनी सैनिक त्यांचे कुटुंब आणि शहीद झाल्यानंतर त्या कुटुंबातील सर्व माता,पिता ,पत्नी, मुले यांची अवस्था काय होते ? याविषयी शोक संवेदना व्यक्त केल्या.
चाळीसगावात शहिदांना श्रद्धांजली चाळीसगाव (प्रतिनिधी) पूलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या जवानांना शुक्रवारी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मिलींद बिल्दीकर यांनी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा तीव्र निषेध केला. आज शहीद जवानांच्या कुटुंबियांवरच नव्हे तर संपूर्ण भारतावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा हल्ला प्रत्येक नागरिकाच्या मनाला इजा पोहचवणारा असून सबधीत दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound