चाळीसगावात संभाजी सेना आयोजित शिवगीतांचा कार्यक्रम उत्साहात

chalisgaon

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित संभाजी सेनेने आयोजित केलेला शिवगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुनील खरे, सचिन सरदार, अण्णा सुरवाडे, नीलेश सोनवणे, शालिनी देवकर, स्नेहल सापनर, गायत्री चौधरी या कलाकारांनी विविध गीत आणि पोवाड्यांच्या माध्यमातून शिवरायांचा जीवनपट रसिकांसमोर साक्षात उभा केला होता.

 

शिवगीतांचा कार्यक्रमाला हजारांच्या जनसमुदायाने देखील कलाकारांना टाळ्या वाजून आणि प्रचंड अशा जयघोषात दाद दिली. यावेळी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील कार्यक्रमाचा अन्नद लुटला. दरम्यान, तत्पूर्वी, शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा, यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. महाआरती प्रसंगी संभाजी सेना प्रदेश विधी सल्लागार अॅड. आशा शिरसाठ, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा मंगेश चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, तालुकाप्रमुख रमेशआबा चव्हाण, सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोरपडे, ज्येष्ठ नेते प्रदीपदादा देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, रोशन जाधव, सदाशिव गवळी, घृष्णेश्वर पाटील, पं.स. सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, मार्केट कमिटी संचालक जलमबापू पाटील, डॉ. सुनील राजपूत, डॉ. विनोद कोतकर, पत्रकार संघाचे रमेश चौधरी,मुरली आबा पाटील, नगरसेवक सत्यवान राजपूत, प्रशांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य शशीभाऊ साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते बबन पवार, प्रा.गौतम निकम, अनिता शर्मा, आरतीताई पूर्णपात्रे, सविता कुमावत, डॉ बाविस्कर उमाकांत, जामडी सरपंच दीपक राजपूत, ठाकूर सर, सौ ठाकूर मॅडम, अहिराणी चित्रपट निर्माता संजय सोनवणे तसेच असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी जाहीर केले की, जर येत्या संभाजी महाराज जयंती म्हणजे १४ मे २०२० पर्यंत या जागेवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला गेला नाही. तर महाराष्ट्र भरातील २१०० संभाजी सैनिक याच जागेवर आत्मदहन करतील, यावर उत्तर देताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले या विषयात मी स्वतः जातीने लक्ष घालून लवकरात लवकर पुतळा उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेन.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष अविनाश काकडे, तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, प्रदेश संघटक सुनील पाटील, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णा पाटील, लक्ष्मण बनकर, प्रवीण ज्ञानेश्वर पगारे, राकेश पवार, सुरेश पाटील, विजय देशमुख, दिवाकर महाले, कृष्णा कोळी, ऋषिकेश पाटील, किशोर घुगे, गोटू अगोने, खुशाल सोनवणे, भैय्यासाहेब देशमुख, कुणाल पाटील, नितीन चौधरी, सचिन जाधव, चेतन सोनार, अमोल चव्हाण, अंकित पाटील, राकेश गुरव, नीलेश सोनार, गोपीनाथ घुगे, सुनील ठाकूर, अविनाश घुगे, दर्शन सोनार, कुणाल लाड, ललित पाटील आदींनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content