पारोळा येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

parolanews

पारोळा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने शिक्षक मित्र परिवार व शिवजयंती उत्सव समितीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबीरात १३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

पारोळा येथील शहरात शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबीराचे उद्घाटन नगरसेवक रोहन मोरे यांनी स्वत: रक्तदान करून केले.

या शिबिराला माजी पालकमंत्री डॉ.सतिष पाटील, कृउबा सभापती अमोल पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा.आर.बी. पाटील, नगरसेवक मनिष पाटील, मनोराज पाटील, डी.बी.पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी, रावसाहेब भोसले, अभय पाटील पत्रकार, योगेश पाटील पत्रकार, तसेंच रविंद्र पाटील अपंग संघटनेचे राज्याध्यक्ष, देविदास पाटील अपंग, रजिवोद्दीन शेख, महिला मंगला पाटील यांनी रक्तदान करून समाजात आदर्श निर्माण केला. या समाजोपयोगी व स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.

यांनी घेतले परिश्रम
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख जितेंद्र पवार, डॉ.पृथ्वीराज पाटील, संदिप पाटील, गोपाल पाटील, देविदास सोनवणे, सचिन देशमुख, निलेश पाटील, भुपेंद्र पाटील, रवींद्र पाटील, दिपक गिरासे, गुणवंतराव पाटील,नरेंद्र पाटील, गिरीष वाणी, सुनिल जाधव, राजकुमार पाटील, जितेंद्र सोनवणे, दिलीप ठाकरे, ज्ञानदीप पाटील, जे.बी.पाटील, दिपक पाटील, प्रविण कोळी, जयप्रकाश सुर्यवंशी, यशवंत पवार, राकेश शिंपी, आशिष निकम, विजू पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Protected Content