Home राजकीय योगी आदित्यनाथ हे जनरल डायर सारखे वागताय : नवाब मलिक

योगी आदित्यनाथ हे जनरल डायर सारखे वागताय : नवाब मलिक


yogi and malik
 

मुंबई (वृत्तसंस्था) मरायला आला तर जीवंत कसे जाल, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. त्यावर लोकशाहीत योगींचे हे विधान कदापि खपवून घेतले जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयानेही लोकांना विरोध करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतरही उत्तर प्रदेशातील आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार करण्यात आला. योगी आदित्यनाथ हे जनरल डायर सारखे वागत आहेत. हे कदापिही सहन केलं जाणार नाही, असा इशारा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

 

ज्यांना मरायचे आहे, त्यांना वाचवण्यासाठी काहीही करता येणार नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात आंदोलकांनीच गोळीबार केला आणि त्यांच्याच गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला, असे धक्कादायक वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले होते. त्यावरून काँग्रेससह विविध पक्षांनी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. योगी आदित्यनाथ हे जनरल डायर सारखे वागत आहेत. हे कदापिही सहन केले जाणार नाही, असे आता नवाब मलिक यांनी म्हटले आहे.


Protected Content

Play sound