Untitled 1 copy
राजकीय, राज्य, राष्ट्रीय

निलेश राणेंनी काढला गुलाबराव पाटलांचा बाप !

शेअर करा !

Untitled 1 copy

मुंबई (प्रतिनिधी) सेनेवाले काँग्रेस राष्ट्रवादीचं शेण खतायत ते चालतं…मला कधी कधी प्रश्न पडतो ह्याचं नाव ह्याच्या बापाने गुलाब काय म्हणून ठेवलं??? अशा शेलक्या शब्दात भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर ट्वीटरवरून टीका केली आहे. दरम्यान, राणे यांनी थेट गुलाबराव पाटलांचा बाप काढल्यामुळे यावरून जोरदार राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

spot sanction insta

 

ना.गुलाबराव पाटील यांनी मनसे हिंदुत्वाच्या मुद्यावर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू पाहत असले तरी हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा लावून धरला होता. तेव्हापासून प्रत्येक शिवसैनिक औरंबगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर म्हणूनच करत असून त्यामुळे आमचे उष्ट कोणी खाऊ नये, असे वक्तव्य गुरुवारी जळगावात केले होते. गुलाबारावांच्या याच वक्तव्यावर निलेश राणे यांनी शेलक्या भाषेत टीका केली आहे. राणे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘सेनेवाले काँग्रेस राष्ट्रवादीचं शेण खतायत ते चालतं…. मला कधी कधी प्रश्न पडतो ह्याचं नाव ह्याच्या बापाने गुलाब काय म्हणून ठेवले. दरम्यान, राणे यांच्या टीकेवरून जोरदार राजकारण पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावर शिवसेना किंवा गुलाबराव पाटील यांच्याकडून कुठलेही प्रतिउत्तर आलेले नाही.