राजकीय, राज्य

घरभर चिठ्ठ्या वाटणाऱ्या राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार? ; पवारांनी उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली

शेअर करा !
pawar and patil
 

कोल्हापूर (वृत्तसंस्था) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी माझ्या वाचनात आले, खरे खोटे माहित नाही. चंद्रकांत पाटील यांना घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला. त्यामुळे अशा राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार’ अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटीलांची खिल्ली उडवली आहे.

  • spot sanction insta
  • advt tsh flats

 

 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिल्लीत काँग्रेसने ‘आम आदमी पक्षा’शी हातमिळवणी केली होती, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर शरद पवार यांनी निवडणुकीवेळी घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला, त्यामुळे अशा राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार? अशी गालातल्या गालात हसत शरद पवार यांनी खोचक टोला लगावला आहे. याआधी, चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना डिवचले होते. शरद पवार यांची प्रतिक्रिया फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका केली होती.