राजकीय, राज्य, राष्ट्रीय

सीएएचा फटका फक्त मुस्लीमच नाही तर मागासवर्गीयांनाही बसू शकतो : शरद पवार

शेअर करा !

sharad pawar in jalgaon

कोल्हापुर (वृत्तसंस्था) सुधारित नागरिकत्व कायद्याचा (सीएए) फटका फक्त मुस्लीमच नाही तर मागासवर्गीयांनाही बसू शकतो, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

  • spot sanction insta
  • advt tsh flats

 

कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हटले की, समाजांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सीएए कायद्याला विरोध करणाऱ्यांमध्ये फक्त फक्त एकच समाज आहे, हे खरे नाही. या प्रकरणी फक्त जागरूकता मुस्लिम समाजाने जास्त दाखवली. सीएए विरोधातील आंदोलनामध्ये फक्त मुस्लीम समाज असल्याचे उभे केले जातेय. मात्र, यात तथ्य नाही. या आंदोलनामध्ये सर्व जाती-धर्माची लोकांचा सहभाग असल्याचेही पवार म्हटले.