राजकीय, राज्य

काँग्रेस विचारांची ‘शिदोरी’ संपली : शेलारांचा हल्लाबोल

शेअर करा !

ashish shelar

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रातील काँग्रेस विचारांची उरली-सुरली ‘शिदोरी’ संपली असल्याचे नमूद करत भाजप नेते आशीष शेलार यांनी आज जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

  • spot sanction insta
  • advt tsh flats

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिदोरी या मुखपत्र मासिकातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयीच्या दोन लेखांवरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसवर आज जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील उरल्या सुरल्या काँग्रेसची विचारांची शिदोरी आता संपली असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. या संदर्भात त्यांनी आज एक ट्विट करून काँग्रेसवर टीका केली आहे. यात नमूद केले आहे की, ”महाराष्ट्रातील उरल्या सुरल्या काँग्रेसची विचारांची मशिदोरीफ आता संपली त्यामुळे सावरकरांना बदनाम करणारे गलिच्छ लेखन ते करीत आहेत. त्यामुळे शिदोरीत अपमान करणार्‍या या माजोरी काँग्रेसला सावरकरांचा महाराष्ट्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.”

राज्य सरकारने ‘शिदोरी’ या मुखपत्रावर बंदी घालावी अशी मागणीही भाजपकडून करण्यात येत आहे.